सीक्रेट मिशन...
माझ बाई सीक्रेट मिशन , सीक्रेटच असते ,
मी सांगते ऐकीला , कसं काय? गावभर पसरते ...
विचारले तिला तर ती , उलट मलाच बोलते ,
विश्वास नाही का ? माझ्यावर , मि काय? गावभर पसरवते...
तिच्या प्रश्नांच उत्तर माझ्याकडे नसते , म्हणून मी चूप बसते ,
जर इने सांगितले नाही कुणाला मग असे वाऱ्यांसारखे कसे काय? गावभर पसरते ...
तो येऊन म्हणाला मला, कशी गं तू आपले ठरले ना ,
स्वतःच्या पायावर उभं होऊ मग आपल्या नात्याला नाव देऊ पण आताच कसे हे गावभर पसरते ...
चिडून त्यांच्या आईने , घर माझे गाठले बरं का?
लहान आहे आपले मुले , आताच सावरा बरं का? नाही तर हे गावभर पसरेल ...
तेव्हा पासून माझ्या आईने , मल उंबरठाही ओलांडू दिला नाही ,
त्याचा फोनही बंद असला तरी , मी आणि तो भेटला हे गावभर दिसते ...
आता ठरवले बाई ,कुणाला काही सांगायचे नाही ,
पण पोटात दुखले की , आपोआप सिक्रेट मिशन गावभर पसरते ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा