मनाचा संघर्ष...

 

रोजचा दिवस सारखा नसते , काल पावसाळा तर आज उन्हाळा असते,
चालला होता मनाचा संघर्ष जीवघेणा काल , आज संघर्ष मनाचा बहणा असते ...

वाटत होती जी काटेरी वाट चालतांना, पाय रक्तबंबाळ झाले होते ,
आज पडता गाठ त्या ध्येयाशी , मनाला काटेरी वळणाचे अप्रूप वाटत असते ...

तिच्या नजरेतला तो किती प्रेमळ , आभाळी भरलेला ढग जणू,
बरसता तो तिच्यावर मुसळधारपणे , सर्व वाहून नेणारा पूर असते ...

काटा सरकता घड्याळीचा , वेळही समोर समोर वेगाने पळते ,
मागे राहून गेलेल्या आठवणींना उजाळा देण्या , वेळ पून्हा मागे वळत असते ...

काल लिहूण ठेवलेल्या कवितेचा , आज  भावार्थ वेगळा भासते ,
चारोळी रचते मन ओघा ओघाने  , तिला कवितेचा साज  चढत असते ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...