चंद्रपूर ...
सुर्याचा वाढवून पारा , उन्हाला बघा इथे जाग येई ,
नाव चंद्रपूर जरी , गरमीचा तडाखा इथे सोसला जाई ...
महांकालीच कुळदैवत , कोळश्याने भरल्या खाणी ,
जरी शहर लहान माझं तरी ,थोरा गरीबांला रोजगार देई ...
ताडोबाची स्वारी करता ,डोळ्यांना होई व्याघ्र दर्शन ,
जीवाचा ठोका चुके , बघता रूप रौद्र देखण ऐटीत बाई...
गोंडराज्याचे साम्राज्य चांदागडावर , सांगण्या ऐतीहासीक वास्तु उभ्या . ,
स्मरणार्थ प्रेमाचे प्रतिक समाधी , आठवण करून देई राजा बिरशहाची आणि राणी हिराई ...
महांकाली आहे जागृत देवता, यात्रेसाठी येती लाखो भक्तगंण ,
असं काळ्या सोन्याचे शहर माझे , भक्त माती कपाळी लेई ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा