त्याच ढाब्यांवर...

 

चल ना आज भेटू आठवांना पुन्हा जुन्या त्याच ढाब्यांवर ,
कँडल लाइट डिनर करू लाईट जाता त्याच ढाब्यांवर...

श्वापदांचे आवाज कर्कश मन विचलीत घाबरलेले,
प्रेमाची कळी मनात फुललेली उमलु पुन्हा त्याच ढाब्यांवर...

शिवार काळोखाने भरलेलं आकाशात चांदणे पसरलेले,
दिवाना मौसम पून्हा खूणावत आहे चल त्याच ढाब्यांवर...

मेघ आपापसात होते गर्जत सोबतीला विजांचा तांडव ,
मनातही वारा सुसाट त्यावेळेस चल पुन्हा त्याच ढाब्यांवर...

आयुष्याच्या मध्यात येता येता बघ झिजून गेलो आपण,
स्वतःतचं विसरलो स्वतःला भेटाया पुन्हा चल त्याच ढाब्यांवर...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...