एक पान ...

 कूठल्या तरी वाटेने तु येत होता ,

भरल्यां डोळ्यांनी मज निरोप देत होता ...


पान एक शेवटी फांदी धरून ,

साजंवारा तया सोबत गूणगूणत होता ...


उरलेला त्राण त्या देठात ओतून ,

एकांतात आठवांचा उत्सव होता ...


कुणी जाळले निखारे वृक्ष पायथ्याशी ,

झूंज अखेरची धुरा सवे देत होता...


वाट होती तयाला येईल वसंत ,

झडलेल्या पालव्यांना खुणावीत होता ...


आस ना सोडली त्यांने शेवटपर्यंत ,

तो शेवटी गळला तेव्हा पानांना बहर होता ...




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...