अभिमान...
मी माझा सार्थ अभिमान आहे ,
स्वाभिमानासवे जागृत अभिमान आहे ...
रक्त मराठी सळसळते मराठ्यांचे,
महाराष्ट्र जन्मभूमी माझा अभिमान आहे...
सह्यांद्री सातपुडा रक्षणार्थ उभा ,
गोदावरी कावेरीचा जलअभिषेक अभिमान आहे...
ज्ञानेश्वर तुकाराम मुक्ताईचा संत संग,
डॉ. बाबासाहेबांची विद्वत्ता अभिमान आहे ...
छत्रपती शिवरायांचे आम्ही लेकरे सन्मान,
बोलतो मराठी आमच्या वंशाचा अभिमान आहे ...
आया बहिणींचा करा आदर ही शिकवण,
भावा बहिणींच्या नात्यांचा अभिमान आहे...
कारभारणींची शिदोरी कारभाऱ्यांचा दंड पिळदार,
स्व :कर्तृत्वाचा शिलेदार उभा अभिमान आहे...
मी माझा सार्थ अभिमान आहे ,
स्वाभिमानासवे जागृत अभिमान आहे ...
खुप.... खुपच छान रचना 👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवाव्वाऽ खूपच छान रचना 👌
उत्तर द्याहटवाआबा
🙏