माझे हरवते भान...
नक्षत्र तुझ्या डोळ्यात ,पाहता हरवते भान ,
त्याच चांदण्यातुनी चालतांना, माझे हरवते भान...
पाकळ्या गुलाबी मऊ, ओठी स्वरचल्या ,
गालाची खळी उमटतांच , माझे हरवते भान...
गळ्यात कंठी मोत्यांची , कर्णी मोत्यांच्या कुड्या,
चमक उठता डोळ्यांत मोत्यांची , माझे हरवते भान...
काकणांची कट्टी मनगटांशी, किनकिन करे फार,
लाजता झूरता ती अशी डोळ्यांत,माझे हरवते भान...
किती छळशील प्रियाला , सांग त्या रेशमी बटेला,
वारा शिरता कुंतलात रेशमी,माझे हरवते भान...
काया सुवर्णापरी लखलखणारी, त्यावरी अदा जीवघेण्या,
हर अदा देखीता सल हृदयात,माझे हरवते भान...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा