मन तुझ्याच दिशेने चुकते...

 

नाही नाही म्हणता वाट तुझ्याच दिशेने चुकते ,
चुकल्या वाटा पूर्वीच्या तरी मन तुझ्याच दिशेने चुकते...

धागा गुंतला सोडवायला जाता जाता पुन्हा ,
तुटता गाठी पडल्या तरी मन तुझ्याच दिशेने चुकते...

फांद्या तुटता पक्षी उडाले घरटे सोडून ,
तुटलेले घरटे रडवेल तरी मन तुझ्याच दिशेने चुकते...

हरल्यावरही जिंकण्याचा अनुभव का ? देते,
तुटलेल्या मनाच्या खुणा तरी मन तुझ्याच दिशेने चुकते...

मी त्याला पुन्हा पुन्हा भेटते कळते तरी चुकते ,
चुकलेलं मन हळहळते तरी मन तुझ्याच दिशेने चुकते...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...