मनाला दिलेली साद...
मनाला दिलेली साद...
ऐकली ना तु मनाने मनाला दिलेली साद ,
कसे सांगु तुला सख्या कुठवर आली याद...
पायरी ती उबंरठ्याची कधी ओलांडली नाही,
उंबराही हिनवे मला सांजप्रहरी का? केली याद...
पालापाचोळा जीवनाचा उन्हाच्या झळेने वाळला,
पाय ठेवता आक्रंदते पर्ण अजूनही ओली याद ...
तुम्हास काय? ठावुक कधी मी दाखवलीच नाही,
रोज पडे चिरा काळजाला जेव्हा निघते तुझी याद ...
त्या पुस्तकाची पाने जेव्हा जेव्हा चाळते मी,
सुकलेल्या गुलाबांचा सुगंध करून देते तुझी याद...
करेल का? कुणी माझी आठवण सदैव मनात ,
जेव्हा वाचेल माझी रचना उफाळून येईल याद...
विसरले मी सारे मनास वारंवार सांगते बघ ,
आता नको वेदनेचे पहारे म्हणूनही येते तुझी याद...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा