सुखी संसार...
नको ऐश्वर्यांचा साज नाही पैशाची बरसात ,
दुःखात मिरवू सुख तुझ्यामाझ्या सूखी संसारात ...
एका घडीला जाणे एका घडीला येणे ,
घडी घडीचे घेणेदेणे तुझ्यामाझ्या सूखी संसारात ...
फाटक्यां वस्त्रा मध्ये भावना जपून ठेवीन ,
फाटका काठ शिवून जपने तुझ्यामाझ्या सूखी संसारात ...
चिमणी चिमण्यांचे चाले प्रयास घरटे उभारण्या ,
काडी काडी जमवू हिंमतीने तुझ्यामाझ्या सूखी संसारात ...
संसारात चालतांना उपसावे लागे कष्ट रस्ता कठीण ,
समजून घेऊ ऐकमेंका आयूष्यभर तुझ्यामाझ्या सूखी संसारात ...
वावा मनिषा सुंदर
उत्तर द्याहटवा