धोका...
कुरवाळून जखमांना विचारले , असे का तळमळले ,
सर्वस्व मानले ज्यास , त्याने झिडकारता भाव तळमळले...
धोकाधडीचा आरोप , मज स्वप्नावर मन आक्रंदले,
आठवून सोबतीच्या क्षणांना , आठवांच्या राती तळमळले ...
नको ना फासू काळीमा , प्रितीवर माझ्या प्रिया ,
मन हरता प्रेम हरले ,मनातल्या प्रीतीचे तार तळमळले ...
कुठे जाणले मी ,तुझ्या अशा वागण्याला पहिले ,
विचारते मला दुनिया , भ्रमिष्ट भासाच्या श्रद्धेसाठी तळमळले...
प्रेमच होता शाप जगण्याचा, जीवनाचे कसे हसे झाले ,
मनाने ही डोळे मिटून घेतले ,अंतरंगाचे श्वास तळमळले ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा