प्रेमाची परिभाषा...

 

प्रेमाची परिभाषा हीच ती पारीजातकापरी फुलांवी,
अंगणात माझ्या तरी तुझ्या दारी सुगंध शिंपीत गंधाळावी...

नको बांधूस तु तिला व्याख्या का ? तूला कळावी ,
अबोल बोलकी भाषा ही माया लागता पशूलाही कळावी...

हर्ष मनाचा ओठांवर हास्याची लकेर संसर्गजन्यपरी पसरावी,
क्षणोक्षणी बहरत जाणारा आनंद नदीपरी ओसंडून वहावी ...

प्रेमाची नसे कोणतीच परिभाषा ही मनाची मनाला कळावी,
प्रेमच ओजंळीत वेचून आनंदात आसमंती ही उधळावी ...

श्रावणासोबती बेधूंद बरसावी मन भिजून ओलीचिंब व्हावी,
तुझ्या ओंजळीत भरून परत निसटून दुसऱ्यांस मिळावी ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...