वेदना...

 मनास घायाळ करून वेदना विरत चालली आहे ,

रक्तबंबाळ मनाची आरोळी हवेत विरत चालली आहे ...

पावलांना पावलांची झळ पोहोचली चालता चालता ,
रेतीत सोबतीला रूतणारे पदचिन्ह विरत चालली आहे ...

अंधुक त्या वळणावर कोण लपून बसला होता ,
वार होता अचानक आरशातले प्रतिबिंब विरत चालली आहे ...

क्षण सुखाचा जगला होता दोघांनी दुनियेस लपून ,

ओंजळीत लपलेल्या आठवांच्या छटा विरत चालली आहे ...

शांत मनसागरात कसा कोणी खडा आठवणीचा मारला ,
वलय वलयात मिसळून तरंग मनीचे विरत चालली आहे ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...