निर्जीव ...
कधी बहरला तो वृक्ष पाना फुलांनी डवरला ,
सरीसोबत भीजला वाऱ्यासवे बेधुंद झुलला...
कधी किलबील पक्षांची ऐकता खट्याळ झाला,
उडवता फांदीवरून एका अलगद पानांचा आधार दिला...
सावली ती गार घनदाट फक्त त्यांच्याजवळ होती,
विसावले किती त्याखाली पण नाश त्यांचाच केला...
तो देत राहीला निरंतर मनाच्या गाभाऱ्यांतून सर्वां ,
कपुत कशे निपजले ओरबडून त्यांचाच घात केला...
नातं जे प्रेमाने विश्वासाने त्याने जपले निस्वार्थ ,
निर्जीव मनाला करून उन्हांत ऐकटाच करपला ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा