चक्रव्यूह ...

 असंख्य विचारांचे जाळे , डोक्याभोवती विणलेले ,

चमकणाऱ्यां तारांना गुरफटून ,मी किडा अडकलेले ...

सारता बाजूला एक एक तार , पून्हा विस्कटलेले ,
मार्ग निघता निघत नाही, पुन्हा गहरी अडकलेले ...

डोळे मिटता थैमान घालते , शब्द विचार झालेले ,
चक्रव्युह यांनी रचलेला , आरोपात मी अडकलेले ...

अभिमन्यूने ऐकले फक्त , चक्रव्यूहात कसे शिरलेले ,
लढून गेला तो विर तिथे , मी आपल्याच भोवती अडकलेले...

पटतेय का ? तुम्हाला , किती भयावह विचारांची गर्दी ,
कोणी जीव दिलेले , कुणी वाट अडखडत अडकलेले ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...