का ? मतभेद होते ...

 

मतांनी मतांशी केलेले भेद का? मतभेद होते ,
अहो कळेना मला बोलता जरा खटकले का? मतभेद होते ...

पाचही बोटांची उंची मोजली तेव्हा कळले ,
तफावत विचारांची खोल असली  का? मतभेद होते ...

गंमत असते थोडीशी जेव्हा ऐकमेकांचे ना पटे ,
दोन बाजू तरी नाण्याच्या किंमतीचे का? मतभेद होते ...

जीवनाची नाव समुद्रात सोडून दिली खलाश्यांने ,
वाहवत कुठे नेणार नियती सांगा यात का ? मतभेद होते...

भेद हा असणार म्हणूनच विवीधता नांदते सुखाने,
मनमुटाव संवादाचे असले की हतबल का? मतभेद होते ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...