दोष कुणाचा ...
आघात केला मनावर घाव घालू कसा ,
दोष कुणाचा विचारतोस पुन्हा घाव घालतेस कसा ...
हिमालयावर बर्फ आच्छादला तरी उदरी लावा ,
आग उदराची विझवण्या सांग घाव घालतेस कसा ...
भेटला तो गुलमोहर दारात उभा जो हात जोडून ,
बहरलेल्या फांद्यांनाही छाटल्या घाव घालतेस कसा ...
पाण्यात शांततेची फक्त चाहूलच होती दिसत
वलयांची सुटाया लागली साथ घाव घालतेस कसा ...
मज तिन्हाईतच समज मी तुझ्या उपयोगी नाही ,
माझ्या मनाचे तुकडे करण्या घाव घालतेस कसा ...
डोळ्यासमोर नको राहू उभा जरी दिसला तू
पण तुलाच पाहण्या आघात झेलते घाव घालतेस कसा ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा