सावल्यांही सोडून गेल्या...
परतल्या पावलांच्या निशाण्या सावल्याही सोडून गेल्या ,
क्षणात उडता पाखरे आठवांचे सावल्याही सोडून गेल्या ...
रेतीत बंगला बांधलेला सख्या विरून गेला तेव्हाच ,
विश्वासाची हत्या करताच प्रेमाच्या सावल्याही सोडून गेल्या...
मन धावत होते वाटेवर तुझ्या वाटच हरवली इथे ,
डोळे भिरभीर शोधते जरी तुझ्या सावल्यांही सोडून गेल्या...
ऐकु येता गुंज सनई चौघड्यांची मन तिथेच थांबते,
पाहिले स्वप्न मिळून त्या स्वप्नांच्या सावल्यांही सोडून गेल्या...
उरले ना त्राण काही मनात मन असे निर्जीव झाले ,
मन आडोश्याला शोधते अजून ज्या सावल्यांही सोडून गेल्या...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा