आरशाची खोली ...

 

न्याहाळता रूप आरशात दिसते मजला मुक मनाचे रूप ,
गहरी खोली आरशाची बघून भावनाही जाणून लपवते रूप ...

बोलक्या क्षणांच्या गाठीभेटी कधी  आता बंद कवाडे ,
अदृश्य मनाचे क्षण बोलके आरशात जपते आरसपाणी रूप ...

बोलू पाहते कितीदा ओठात शब्द घेऊन थांबतात बघ ,
किती केल्या विनवण्या मनाच्या दाखवू नको तू खरं रूप ...

मन ऐकत नाही माझं करते हतबल संभ्रमात पाडते ,
नाही म्हणून पाहता त्याला मन दर्पणात हसून निखरते रूप...

तू असाच जीवनात आला जीवन माझेच तू झाला ,
या वळणावर जगण्यासाठी मागते मागणे तुलाच तुझे रूप ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...