अपूर्ण स्वप्ने ...

 

या कोमल तनुवरी स्पर्श घसरतो असा,
ओला दव प्रेमाचा निखळतो जसा ...

चांदण हळूवार चमकणार आकाशी ,
रंग रातीचा डोळ्यात दाटतो जसा ...

फुलाच्या गर्भात मकरंत लपलाय ,
भुंगा गोडवा प्रितीत चाखतो जसा ...

येतो अचानक प्रवासी कुठला बागेत,
पडता नजर फुलावरं खुडतो जसा ...

आयुष्याची अपूर्ण स्वप्ने त्या फांदीवरी,
ती आठव फुलतांना वृक्ष रडतो जसा...

हरवते वाट सापडते पुन्हा जगण्याची,
जीवन रेतीच्या पाऊलखुनांचा वसा जसा...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...