अनामित भाव...

 

नात्यांचा गोडवा हा शब्दांत बांधला का ?
मागे उरला अनामित भाव मनाचा ...

पाखरापरी सजला पंख फुटताच उडला ,
काळ गोठणारा अनामित भाव मनाचा...

शब्दं मुका कधिचा डोळ्यांतच हसला ,
राखेखाली धूमसला अनामित भाव मनाचा...

ओठांच्या दाळिंबांना रंग लाल लाल चढला,
हुंदका गळ्यांतच दाटला अनामित भाव मनाचा...

जाग आली जाणिवेला स्पर्श कसा भिजला ,
डोह मौनाचा साचे अनामित भाव मनाचा...

नात्यांचा गोडवा हा शब्दांत बांधला का ?
मागे उरला अनामित भाव मनाचा ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...