लाईट कॅमरा अँक्शन ...

 सकाळ होताच तिच्या अभिनयाची सुरवात होते ,

लाइट कॅमेरा अँक्शन म्हणून दूखणी लपवत होते ...


कालचा घाव मनाला नवऱ्याने दिलेला बघ ,

मन सलते राहून राहून तरी मुलासवे हसत होते...


नौकरी करतांनाही नशीबात कुठे असते सुख तिला,

घरचा व्याप सांभाळून तीथेही तेवढीच कार्यरत होते...


तूही असतो तेवढाच तत्पर दुःखास लपवण्या ,

पण तिची तारांबळ उडतांना सर्वच पाहत होते ...


सुधार होतोय जरा कासवाप्रमाणे समाजात तरी,

अजून खुपच वाव बाकी आहे तुलाही समजत होते ...


शिकव तिलाही तुझ्यासवे अशिक्षीत नको राहू देऊ ,

लुगड्याचा पदर खोचून तुझ्या बरोबरीने राबत होते ...


सकाळ होताच तिच्या अभिनयाची सुरवात होते ,

लाइट कॅमेरा अँक्शन म्हणून दूखणी लपवत होते ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...