आभाळ...

 

ढग ढगांच्या मागे धावु लागले ,
ऐकमेकांत भिजले ओथंबुन निघाले ...

ते हलकेच विजेचे ताशेरे ओढले  ,
व्याकूळ मनास अनामिक घोर लागले ...

आभाळ भरगच्च भरून आले ,
सुरमधूर स्वरात सरींने गायले...

मृदुगंध मातीचा श्वासातून मोहरले,
लयीत वलयांकित प्रतिबिंब झुलले...

सिमा नाही प्रेमाला जे पृथ्वीनी दिले,
हिरव्याकंच कायेवर जीवन फुलले...

आभाळ मनाचं मनावर बरसले,
प्रेमात तुंडूंब मन दुःखातही हसले...

ढग ढगांच्या मागे धावु लागले ,
ऐकमेकांत भिजले ओथंबुन निघाले ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...