बंध प्रेमाच्या सहवासाचे...
कधी विसरू लागले मी, बंध प्रेमाच्या सहवासाचे ,
हृदयाला हाक देऊन सांग,बंध प्रेमाच्या सहवासाचे ...
प्रेमात बुडालेले जग माझे, कधी कोरडे जाहले ,
ओलावा दे त्या आठवांचा ,बंध प्रेमाच्या सहवासाचे ,
रित्या रित्या मनात , दाटला जाळ विरहांचा ,
फुंकर घाल वेदनेला ,बंध प्रेमाच्या सहवासाचे ...
भेटलो होतो कधी, वळण जपून ठेव मनात,
रस्ता चुकला तर उकल, बंध प्रेमाच्या सहवासाचे ...
शब्द आले दाटून, प्रेमाने जेव्हा हूंदका दिला,
का? आठवावे लागे तुला,बंध प्रेमाच्या सहवासाचे ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा