अपहरण...

 

ओढ होती त्या पाखराला आकाशात झुलायची ,
चंद्र सूर्य ताऱ्यांनाही ओजंळीतून न्याहाळायाची ...

उंच उंच झेप घेत पंखावर आसमंत घ्यायची ,
ढगांचा पाझर आपल्या चोचीतून चाखायची ...

पसरता पंख काटा काटेरी कुंपणाचा रुतला ,
किंचाळला पाहूनी रक्तबंबाळ काया पंखाची...

जखमी वाटेवर आता अपहरण भावनांचे झाले,
रुते काटे कैक चालतांना का? वाट रुसली त्याची ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...