प्रेमत्रिकोण...

 हळुच डोकावले होते मी हृदयात त्याच्या ,

आज हसतांना दिसला ,ती जागा कधी माझी होती ...


मग डोळयांनीच विचारले माझ्या त्याला,

जो डाव मनासोबत खेळला माझ्या  ,चूक माझी होती...


ओठ शिवले माझे रेशमी धाग्यांना तोडून,

सोडून गेलास मला तु , तिच का ? तुझ प्रेम होती ...


मला कळलंच नाही बघ ना हा प्रेम त्रिकोण,

मी मनात तुला ठेवले आणि तुझ्या मनात ती होती...


आज असह्य होत आहेत या भावना तरी,

भावविभोर मन शांत होईल बघून, तुझा आनंद ती होती ...


कळली आता कुठे या मनाची चाहूल मला,

प्रेमात सर्वस्व अर्पण  करून जगणारी राधा होती ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...