लग्नाची बेडी ...
एकमेकांना एकमेकांसाठी निवडले ,
पडता अक्षता डोईवर दोन जीव एक झाले ...
विचार वेगळे आचार वेगळे वेगळे सारं काही ,
भिन्न विचारात जन्मजन्माचे सोबती कसे झाले ...
नवीन सारं काही म्हणून जुळवाजुळव करून पाहे ,
कुठे जुळेना स्वभाव लहान गोष्टीचाही गदारोळ चाले ...
शेवटी दोघांनाही कळून चुकले संसाराचे गणित ,
एकमेकांसाठी नाही बनले दोघं लग्नाच्या बेडीत अडकले...
सोडून पाहे गाठ आयुष्याची ती ही सुटे नाही ,
पडल्या गाठी तरी लाजेसाठी बघा संसाराचा गाडा चाले ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा