माझा झोका...
अकाशात गेला ,उंच माझा झोका ,
पलटूनी आला , उंच माझा झोका ...
मनात गुदगुल्या , हर्ष वेगळाच झाला,
आहे स्वर्ग सुखाचा, उंच माझा झोका ...
पंखावरी ओढले मी , निळाईचे रंग ,
क्षितीजापरी लाल , उंच माझा झोका...
तुला मनात भरले , पोकळी ना उरली,
भरल्या मनाने झूलला, उंच माझा झोका...
थांबना जरासा ,माझे ना काही येथे ,
मन तरी घुटमळे घेत, उंच माझा झोका...
ओंजळीत भरल्या ,सरी पावसाळी ,
निसटल्या येथेच मी घेता ,उंच माझा झोका ...
काशात गेला ,उंच माझा झोका ,
पलटूनी आला , उंच माझा झोका ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा